Jain Religious Minority Institution

Courses after 12

Home / Prese Release

Press Coverage

बहुपर्यायी, कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर हवा : प्रा. ए. के. बक्षी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व 'सीईजीआर'तर्फे '३६० दृष्टीकोनातून प्रभावी तंत्रज्ञानाभिमुख शिक्षण'वर वेबिनार

डिजिटल शिक्षणामुळे नव्या संधी उपलब्ध : प्रा. डॉ. संजय चोरडिया सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व 'सीईजीआर'तर्फे '३६० दृष्टीकोनातून प्रभावी तंत्रज्ञानाभिमुख शिक्षण'वर वेबिनार ---------------------------------------------------------------------------------------------------------- विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययनावर भर द्यावा : डॉ. पराग काळकर सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व 'सीईजीआर'तर्फे '३६० दृष्टीकोनातून प्रभावी तंत्रज्ञानाभिमुख शिक्षण'वर वेबिनार ---------------------------------------------------------------------------------------------------------------- तंत्रज्ञानामुळे शिक्षण होतेय 'ग्लोबली कनेक्ट' : दीपक शिकारपूर सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व 'सीईजीआर'तर्फे '३६० दृष्टीकोनातून प्रभावी तंत्रज्ञानाभिमुख शिक्षण'वर वेबिनार पुणे : "विदयार्थ्यांना स्वयंअध्ययन, तसेच गटागटाने अभ्यासाकरिता प्रोत्साहित करावे. डिजिटल शिक्षण देताना शिक्षकही तंत्रज्ञानस्नेही व डिजिटल साक्षर असावेत. स्वतःची सामग्री निर्माण करून वैश्र्विक शिक्षक होण्याची ही चांगली संधी आहे. डिजिटल शिक्षणामुळे ग्रंथालयांचे भवितव्य काय असेल, तसेच ऑनलाईनच्या जगात विद्यार्थी ग्रंथालयात जातील का, असे प्रश्न निर्माण होत आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांनी स्वयं अध्यानावर भर देण्याची गरज आहे," असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. पराग काळकर यांनी केले. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि नवी दिल्ली येथील सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ अँड रिसर्च (सीईजीआर) यांच्या संयुक्त विद्यमाने '३६० दृष्टीकोनातून प्रभावी तंत्रज्ञानाभिमुख शिक्षण' (इफेक्टिव्ह टेक एनेबल एज्युकेशन इन 360 डिग्री परस्पेक्टिव्ह) या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये डॉ. पराग काळकर बोलत होते. या वेबिनारमध्ये प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, उत्तरांचल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. देवेंद्र पाठक, पीडीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ए. के. बक्षी, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष व सीईजीआर'चे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, 'सीईजीआर'चे संचालक रविश रोशन, 'सूर्यदत्ता'चे समूह संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. शैलेश कासंडे आदी उपस्थित होते. प्रा. ए. के. बक्षी म्हणाले, "तंत्रज्ञानाधारित शिक्षणामुळे हजारो अभ्यासक्रम उपलब्ध होत आहेत. बहुपर्यायी आणि कौशल्याचे शिक्षण घेण्यावर भर दिला जात आहे. अशावेळी त्यांचे मूल्यांकन आणि शिकविण्याच्या पद्धतीतही बदल व्हायला हवेत. ऑनलाईनमुळे माहितीचा साठा मोठा असला, तरी त्याला पुस्तकांची जोड असणे आवश्यक आहे. ई-लर्निंग आणि पुस्तके याची सांगड घालावी. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकरिता शिक्षकांचे सक्षमीकरण व्हायला हवे. त्यांना नव्या तंत्रज्ञानाची कौशल्ये आत्मसात करायला हवीत. तंत्रज्ञान ही मानवाची निर्मिती आहे. त्यामुळे त्याचा चांगला वापर करणे आपल्या हाती आहे. विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी पोषक वातावरण व २१ व्या शतकाला पूरक सर्वांगीण ज्ञान देण्याची गरज आहे." डॉ. संजय चोरडिया म्हणाले, "तंत्रज्ञानामुळे शैक्षणिक वातावरण बदलले आहे. डिजिटल पद्धतीने शिक्षण सुरु करताना बऱ्याच अडचणी आल्या. ग्रामीण व शहरातील विद्यार्थ्यांचा विचार करावा लागला. देशातील प्रत्येक भागातून पुण्यात शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. ऑनलाईन शिक्षण चालू करताना डिजिटल पायाभूत सुविधा, शिक्षकांचे तांत्रिक ज्ञान व कौशल्य, तसेच विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य या बाबी लक्षात घ्यायला हव्यात. डिजिटल शिक्षणामुळे अनेक नव्या संधीही प्रत्येक घटकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणाची समस्या नोकरी करणाऱ्या पालकांना जास्त जाणवत आहे. नोकरी करत असल्यामुळे ते आपल्या पाल्याला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचा विचार करून एक विशिष्ट प्रक्रिया सुरु करायला हवी जेणेकरून सगळ्या संस्था, विद्यापीठ आणि विद्यार्थी त्याचे अनुसरण करू शकतील." डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, "आपली संस्कृती बदलत आहे. स्वच्छ पर्यावरण, सॅनिटायझेशन आता बंधनकारक झाले आहे. कोविडमुळे शैक्षणिक पद्धती बदलली आहे. तसेच नवीन आव्हानाना सामोरे जावे लागत आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे जगातील कुठल्याही वक्त्यासोबत आपण संवाद साधू शकतो. शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांनी शिक्षण पद्धतीमध्ये बदल करायला हवा. पदव्युत्तर शिक्षण घेताना प्रात्यक्षिक ज्ञान जास्त महत्वाचे आहे. या अभ्यासक्रमध्ये ५० टक्के आणि प्रात्यक्षिक असायला हवे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर रोजगाराचा प्रश्न उभा असतो. प्रात्यक्षिक ज्ञानामुळे हा प्रवास सुखकर होऊ शकतो. तसेच विद्यार्थ्यांना स्वतः शिकता यायला हवं, याप्रकारचा अभ्यासक्रम तयार करायला हवा. शिक्षकांसाठी देखील वर्षातून एकदा इंटर्नशिप करायला हवी. इंडस्ट्री मध्ये कशाप्रकारे काम चालत याचा अनुभव त्यांना मिळेल." प्रा. डॉ. पराग काळकर म्हणाले, "कोविडमुळे एका रात्रीत शिक्षण ऑफलाईन ते ऑनलाईन सुरु करावे लागले. वर्गात शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होते, आचार-विचारांची देवाणघेवाण होते. ऑनलाईन शिकवताना आणि शिकताना येणाऱ्या समस्यांचे हळू हळू निराकरण करून ही शिक्षणपद्धती सोपी करण्यासाठी विद्यापीठ काम करत आहे. ऑनलाईन तास हा विदयार्थ्यांना कंटाळवाणा वाटायला नको, प्रात्यक्षिके कसे घ्यावेत? अशी बरीच आव्हाने आमच्यासमोर होती. आम्ही त्याचे निराकरण केले आहे. विद्यार्थ्यांना स्वतः शिक्षण घेणे, यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे."



Apply
Online

Quick
Enquiry


Learning
Options
With Us